27 मार्च जागतिक रंगभूमी दिन, परळीत कार्यक्रमाचे आयोजन- रानबा गायकवाड

शेख गणी यांना नाट्य भूषण पुरस्कार
परळी प्रतिनिधी. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा परळी व परळी सिने नाट्य कलावंत संघटनेच्या वतीने परळीत दिनांक 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जेष्ठ पत्रकार व नाटककार रानबा गायकवाड यांनी दिली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे परळी शाखाध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ सिने नाट्य कलावंत शेख गणी यांना याच कार्यक्रमात नाट्य भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.म. नाट्य परिषदेचे परळी शाखाध्यक्ष बाजीराव ( भैय्या) धर्माधिकारी हे राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी सिने नाट्य कलावंत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भोकरे, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे परळी सचिव प्रा. डॉ. विनोद जगतकर तसेच नाट्य कलावंत संघटनेचे सचिव तसेच प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे तसेच लेखक दिग्दर्शक, नाटककार ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड तसेच या कार्यक्रमास नाट्य क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात परळी तालुक्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या नाट्य कलावंतास नाट्य भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच जुन्या आणि नवीन नाट्य कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परळी शहर व तालुक्यातील सिने आणि नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांनी तसेच नाट्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रानबा गायकवाड यांनी केले आहे.

शेख गणी यांना नाट्य भूषण पुरस्कार
शहरातील ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते शेख गणी यांना याच कार्यक्रमात नाट्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शेख गणी यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. याबरोबरच नाट्य क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा परळी व परळी सिने नाट्य कलावंत संघटनेच्या वतीने त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे.