अवैध वाळू उपसा 🔺अवैध वाळू चार वाहने जप्त
सोलापूर- पंढरपूर-अवैध वाळू उपसा वाहतुकीविरोधात व पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल व पोलिस प्रशासनाच्या पथकाने माण व भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे तीन अशोक लेलँडचे पिकअप व ट्रॅक्टर अशी एकूण चार वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली. एकूणच राज्यातील अनेक वाळू घाटावरती अवैध उपसा आणि गौण खनिजाचे उत्खनन होत असून याच्यावर प्रशासनाचा निर्बंध राहिला नाही अशाच घटना बऱ्याचदा दिसून येत आहेत.
३ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता महसूल व पोलिस पथकाने माण नदी पात्रामध्ये अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या अशोक लेलँड कंपनीचे वाहन व बिगर नंबर वाहन तसेच मौजे गोपाळपूर येथील भीमा नदी पात्रात स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टरपकडून जप्त करण्यात आला आहे.

