काचीगुडा-नगरसोल’च्या तीन आरक्षित डब्यांची वाढ

🔷 कोच मध्ये वाढ

हुजूर साहेब नांदेड– उन्हाळीसुट्ट्या आणि लग्नसराई या दरम्यान होणाऱ्या प्रवासी वाढ समोर ठेवून दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी साठी काचीगुडा-नगरसोल-काची गुडा एक्प्रेसमध्ये काही कोचेस वाढवले आहेत हे त्या सात तारखेपासून हे डबे या गाडीला जोडले जातील.
१ आरक्षित वातानुकूलित खुर्चीयान (एसी चेअर कार) आणि दोन दुसऱ्या श्रेणीची आरक्षित खुर्चीयान (चेअर कार) डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्याचे ठरवले आहे.

काचीगुड़ा येथून ७ एप्रिलला सुटणाऱ्या काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस (१७६६१) मध्ये एक आरक्षित वातानुकूलित खुर्चीयान (एसी चेअर कार) आणि दोन आरक्षित दुसऱ्या श्रेणीची खुर्चीयान (चेअर कार) डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ अप डाऊन या दोन्ही गाड्यांसाठी असेल. डबेवाढीनंतर या गाडीत १७ जनरल, २ आरक्षित दुसऱ्या श्रेणीची खुर्चीयान (चेअर कार), एक आरक्षित वातानुकूलित खुर्चीयान (एसी चेअर कार) आणि दोन एसएलआर असे एकूण २२ डबे असतील. या गाडीचे आरक्षण ५ एप्रिलपासून उपलब्ध झाले आहे.