नांदेडचे बसस्थानक स्थलांतरित होणार

संग्रहित छायाचित्र

🔷 नांदेडचे बसस्थानक 🔻 रस्ता दुरुस्ती

नांदेड | नांदेडच्या बसस्थानक आणि रेल्वे स्टेशनला जोडणारा मुख्य रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू होत आहे. त्यामुळे काही कालावधीसाठी नांदेड बस स्टैंड बंद करण्यात येत आहे.तात्पुरते नवीन बस स्थानक कौठा मैदानावर स्थानांतरित करण्यात येत आहे. याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे

.या नव्या निर्णयानुसार येत्या १२ एप्रिलपासून जुने बसस्थानक रस्त्यासाठी बंद करण्यात येणार आहे. नव्या बसस्थानकाची तात्पुरती व्यवस्था होताना प्रवाशांची सुरक्षितता, तात्पुरते शौचालय, स्वच्छतागृहे व अत्यावश्यक सुविधा या सर्व संबंधित विभागाने वेळेच्या आत पूर्ण कराव्यात, अशी सूचना त्यांनी दिली आहे.