🔷 आरोग्य केंद्र
बीड -केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १५ व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्राच्या बळकटी करणासाठी २२ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच हेल्थ युनिटच्या स्वतंत्र आणि मजबूत इमारती असण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १५ व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे विकसित करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.या निधीमुळे ग्रामीण व शहरी भागातील आरोग्यसेवा सुधारण्यास मोठा हातभार लागणार आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र इमारतींसाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. केज २ कोटी ८३ लाख, बीड २ कोटी ९१ लाख, माजलगाव २ कोटी ३३ लाख, आष्टी १० कोटी ८२ लाख, परळी १ कोटी १७ लाख तर गेवराई विधानसभा मतदारसंघात २ कोटी ३३ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

