उन्हाळी विशेष मध्य रेल्वेच्या ६ अतिरिक्त अनारक्षित गाड्यां धावणार

🔶 अनारक्षित 🔶 उन्हाळी विशेष गाड्यां 

🔷 भिवंडी-सांकराईल आणि 🔷खड़गपुर – ठाणे दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या

सोलापूर : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, नियमित गाड्यांव्यतिरिक्त आतापर्यंत १२०४ उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये २९० अनारक्षित गाड्या तसेच ४२ वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे आणि आता प्रवाशांच्या हितासाठी ६ अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांच्या सेवा चालवल्या जातील.

🔺भिवंडी सांकराईल -अनारक्षित साप्ताहिक विशेष (३ सेवा)गाडी नंबर ०११४९

अनारक्षित विशेष गाड्या दि. ९.०४.२०२५ ते दि. २३.०४.२०२५ पर्यंत दर बुधवारी भिवंडी येथून २२:३० वाजता सुटेल आणि सांकराईल माल टर्मिनल यार्ड येथे तिसऱ्या दिवशी दुपारी १:०० वाजता पोहोचेल. (३ सेवा)

ही गाडी या स्थानकांवर थांबेल : कल्याण, इगतपुरी,नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपुर, बिलासपुर, झारसुगुड़ा, राउरकेला, चक्रधरपुर, टाटानगर आणि खड़गपुर

कोच रचना : १० सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणी-सह- गार्ड ब्रेक व्हॅन आणि १० पार्सल व्हॅन.

🔺 खड़गपुर – ठाणे अनारक्षित साप्ताहिक विशेष (३ सेवा) 

गाडी नंबर ०११५० अनारक्षित विशेष दि. १२.०४.२०२५ ते दि. २६.०४.२०२५ पर्यंत दर शनिवारी

खड़गपुर येथून २३.४५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचतील. (३ सेवा) थांबे टाटानगर, चक्रधरपुर, राउरकेला, झारसुगुड़ा, बिलासपुर, रायपुर, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण

या गाडीमध्ये : १० सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणी-सह- गार्ड ब्रेक व्हॅन आणि १० पार्सल व्हॅन असणार आहेत. अनारक्षित विशेष गाड्या आणि कोचसाठी तिकिटे सामान्य शुल्कात यूटीएस द्वारे बुक करता येतील.

या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, संबंधित स्थानकावरती चौकशी करावी अथवा  www.enquiry.indianrail. gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाऊनलोड करा.