मुंबई-आदिलाबाद-मुंबई दरम्यान २४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांची सेवा

🔷 मुंबई-आदिलाबाद-मुंबई दरम्यान २४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त आतापर्यंत १२२८ उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये २९० अनारक्षित गाड्या आणि ४२ वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आदिलाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त २४ उन्हाळी विशेष गाड्यांच्या सेवा चालवल्या जातील.

🔺०१०११ विशेष गाडी दि. १०.०४.२०२५ ते दि. २६.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ००:२० वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ४:३० वाजता पोहोचेल. (१२ सेवा)

🔻०१०१२ विशेष गाडी दि. १०.०४.२०२५ ते दि. २६.०६.२०२५ पर्यंत गुरुवारी आदिलाबाद येथून १८.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२.२० वाजता पोहोचेल. (१२ सेवा) या गाडीचे थांबे :- दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुंड, बोधादी बुजुर्ग आणि किनवट.

कोच प्रकार: चार द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, ०४ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लास, १ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरल व्हॅन.

आरक्षणः विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक ०१०११ चे बुकिंग दि. ०९.०४.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल. अधिक माहिती साठी तपशीलवार वेळापत्रक आणि थांब्यांसाठी कृपया www. enquiry.indianrail.gov. in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.