कोइंबतूर – भगत की कोठी विशेष उन्हाळी गाडी

🔷 कोईम्बतूर-भगत की कोठी विशेष रेल्वे

हुजूर साहेब नांदेड- दक्षिण मध्य रेल्वेकडून उन्हाळी सुट्याचे नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळी सुट्ट्या विविध तीर्थस्थळांच्या भेटी पर्यटन या निमित्ताने होणारी रेल्वे प्रवाशांची  गर्दी लक्षात घेऊन पुढील दोन ते तीन महिने अनेक गाड्यांच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये महत्त्वाची गाडी अंसलेल्या कोईम्बतूर-भगत की कोठी या विशेष रेल्वे गाडीच्या तब्बल २६ फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक ०६१८१ कोईम्बतूर – भगत की कोठी ही विशेष गाडी १० एप्रिल ते ३ जुलैपर्यंत दर गुरुवारी सकाळी २.३० वाजता कोईम्बतूर रेल्वे स्थानकावरून सुटेल. ती आपल्या या प्रवासात काटपाडी, काचीगुडा, निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, भुसावळ, वडोदरा, भिल्दी जंक्शनमार्गे भगत की कोठी येथे शनिवारी सकाळी ११.३० वाजता पोहोचणार आहे. ही गाडी एकूण १३ फेऱ्या पूर्ण करणार आहे.

तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०६१८२ – भगत की कोठी- कोईम्बतूर ही विशेष गाडी १३ एप्रिल ते ६ जुलै दरम्यान दर रविवारी रात्री ११ वाजता भगत की कोठी रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि आलेल्या मार्गानेच कोईम्बतूर येथे बुधवारी सकाळी ९.३० वाजता पोहोचेल.

संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने या गाडीला जनरल, स्लीपर, वातानुकूलित असे १८ डबे असतील. ही गाडी १३ फेऱ्या पूर्ण करणार असून वाढीव फेऱ्यांचा रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील नांदेड, पूर्णा ,भुसावळ, हिंगोली, आदी भागातील प्रवाशाना याचा मोठा फायदा होईल.