◾भावस्पर्शी भजन गायन
बीड/परळी वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन पद्मश्री पुरस्कारप्राप्त मराठी गायिका आणि संगीतकार पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी शुक्रवारी ११ एप्रिल रोजी सायंकाळी घेतले. या निमित्ताने गुरू पं. जसराजजी यांनी शिकवलेले लसत सिरचंद्र सावरी छबी हे भजन मंदिरात पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी सादर केले.
यावेळी श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त प्रा. प्रदीप देशमुख यांनी श्री वैद्यनाथांचा फोटो देऊन व पुष्पहाराने त्यांचे स्वागत केले. तसेच दत्तधाम परभणीचे पिठाधिपती मकरंद महाराज, सौ. माईसाहेब आणि सौ. प्रज्ञाताई देशमुख यांचीही उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना पद्मजा फेणाणी-जोगळेकर म्हणाल्या, परळी वैजनाथला येऊन ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथांचे जवळून दर्शन घेता आले आणि त्या ठिकाणी गायनाचा योग आला, हे आमचे भाग्य आहे.
श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने शास्त्रीय गायिका पद्मजा फेनानी जोगळेकर यांचे स्वागत करण्यात आले सुनील जोगळेकर यांचीही उपस्थिती होती.

