प्रवासादरम्यान ९ लाखाचे दागिने चोरीस

प्रवासादरम्यान दागिन्यांची चोरी

बीड परळी वैजनाथ/ प्रतिनिधी– वयोवृद्ध जोडप्याच्या छत्रपती संभाजी नगर ते सोनपेठ वाया बीड आणि परळी एसटीने प्रवास करणाऱ्या सोनपेठ येथील रहिवासी वयोवृद्ध जोडप्याला मोठ्या दागिने चोरीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले असुन आयुष्यभराची कमाई असलेले सोन्याचे तब्बल ९ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची घटना दि. १० रोजी घडली आहे. याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला माधुरी सुर्यकांत परळकर वय ६० वर्षे रा. महाजन गल्ली, सोनपेठ यांनी संपूर्ण हकिकत नोंदवली आहे. त्यानुसार फिर्यादी महिला व त्यांचे पती हे छ. संभाजीनगर येथे आपल्या मुलीकडे गेले होते. दि.१० एप्रिल २५ रोजी सकाळी ११ वा. संभाजीनगर येथून एस.टी. बसने बीडला आले. बीड येथून सोनपेठला जाण्यासाठी बीड- परळी बसने दुपारी १२ वा. बीड येथून निघून परळीला दुपारी सव्वा दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास बस स्थानकात आले. सोनपेठची बस गेली होती. म्हणुन त्यांनी परळी बस स्थानकावर उसाचा रस घेतला व दुपारी तीन वाजताच्या सुमारास परळी- सोनपेठ बसने सोनपेठला गेले. घरी गेल्यावर बॅग तपासली असता बॅग मधील लाल पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दिसले नाहीत.

या पर्समध्ये अंदाजे रु ३ लाख किमतीची एक खर्बुज्या मन्याची तिन पदरी मोहन माळ, सुमारे ३ लाख रुपये एक सोन्याची पट्टी गंटन सहा तोळे वजनाचे जुने वापरते आणि अंदाजे २ लाख रु. एक नेकलेस साखळी पॅडॉलचे सोन्याचे पॅडॉलमध्ये लाल खडा असल्याले चार तोळे वजनाचे जुने वापरातले आणखी अंदाजे १ लाख रु. किमतीची एक सोन्याची बोरमाळ त्यात डिसको मनी असल्याले दोन तोळे वजनाची जुनी वापरती असे एकुण ९लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व सहकारी करीत आहेत.