प्रेम भक्ती साधना केंद्र येथे परळी महात्म्य सांगता उत्साहात संपन्न

एम एन सी न्यूज नेटवर्क -परळी : शहरातील क्रीती नगर भागातील प्रेम भक्ती साधना केंद्र येथे गेल्या चाळीस दिवसापासून सुरू असलेल्या परळी महात्म्य पारायण या धार्मिक कार्यक्रमाची मोठ्या उत्साहात सांगता कार्यक्रम पार पडला.
ग्रंथकार ह.भ.प राजाभाऊ गंगाधर गरड व ह.भ.प सौ.शिंदेताई यांच्या मधुर वाणीतून परळी महात्म्य या ग्रंथाचे वाचन करण्यात आले, या भागातील भावीक भक्तांनी या पारायण सोहळ्यात मोठया संख्येने भाग घेतला.

यावेळी ज्ञनप्रबोधिनी हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे यांना परळी भुषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने रमेश मुंडीक (धारासुरकर) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पत्रकार, धनंजय अरबुने, संपादक बालकिशन सोनी, महादेव गित्ते सामजिक कार्यकर्ते सचिन भांडे, सर्व पत्रकार मित्र मंडळ,अँड बाळू शहाणे, यूवा कार्यकर्ते विजय दहीवाळ, परळी वैजनाथ सराफ मार्केट असोसिएशन अध्यक्ष, श्री राहुल टाक, संपादक,पत्रकार, मित्र मंडळ परिवार, सर्व सुवर्णकार समाज बांधव संत शिरोमणी नरहरी महाराज भजनी मंडळ, संत नामदेव महाराज भजनी मंडळ, ह. भ.प कंकाळताई, होळंबेताई, गित्तेताई,इंगळेताई, वाळकेताई उपस्थित होते. सर्वांचे सत्कार प्रेम भक्ति साधना केंद्रातर्फे करण्यात आले. आलेल्या सर्व सुवर्णकार समाज बांधव, सामिजक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, सर्व मित्र परिवार, प्रेम भक्ति साधना केंद्रातील साधक, कीर्ति नगर येथील सर्व मित्र मंडळ परिवार उपस्थित