भर दिवसा कोयताचे वार करून एकाची हत्या

🔶 बीड जिल्हा आणि गुन्हेगारी

बीड– बीड जिल्ह्यात खून, हत्या, पिस्टल- रिवाल्वर, कोयते या बाबी अतिशय सामान्य गोष्टी आहेत अशीच सद्यस्थिती एकूणच जिल्हाभरात दिसून येत आहे. मागील वर्षभरात आणि सध्या चर्चा असलेल्या घटना यात भर घालणारी आणि जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना माजलगाव येथून समोर आली आहे. माजलगाव येथील एका पक्षाचा विस्तारक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याची कोयत्याचे वार करून हत्या करण्यात आली. यानंतर हत्या करणारा स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला आणि आपण हत्या केल्याचे त्यांना सांगितले.

घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माजलगाव शहरातील शहानुर भागात एक कार्यकर्त्याची दुपारी कोयताची वार करून हत्या करण्यात आली, हत्या करणारा स्वतःच पोलीस स्टेशनला गेल्यामुळे पोलिसांनी मारे कऱ्याला ताब्यात घेतल्या ची माहिती पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिली. आरोपी व्यक्तीचे नाव नारायण फपाळ वय 38 वर्ष असून माजलगाव तालुक्यातील बेलुरा गावचा तो रहिवासी आहे. नारायण फपाळची सासरवाडी किटी आडगाव असून मयत बाबा आगे यांचेही गाव हेच आहे. आपल्या पत्नीशी बाबा आगे यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय फपाळ याला होता.
या संशयामुळे फपाळ आणि बाबा आगे यांच्या त मतणाव होता. प्राप्त माहितीनुसार हा विषय चर्चेअंती मिटवण्यातही आला होता. मात्र फफाळ याच्या डोक्यात वेगळीच गोष्ट होती, गेल्या काही दिवसापासून फपाळ हा बाबा आगे यांच्या मागावर होता. आज दिनांक 15 रोजी माजलगाव शहरातील शाहूनगरातील स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका जागी आरोपीने त्यांना गाठले आणि प्राण जाईपर्यंत कोयत्याचे वार केले. या हल्ल्यात डोक्यात, शरीरावर वार करून रक्तबंबाळ अवस्थेत बाबा आगे कोसळले. त्यामुळे माजलगाव शहरात काही काळ घबराट पसरली होती. यानंतर नारायण फपाळ माजलगाव पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर होऊन त्यांनी या बाबीची कबुली दिली.

नारायण फपाळ याला शेती हा व्यवसाय असून त्याला एक मुलगी एक मुलगा अशी दोन अपत्य आहेत मागील काही वर्षापासून पती-पत्नीचे सतत भांडण तंटे झाले होते मयत बाबा आगे आणि नारायण फफळ यांची सासरवाडी शेजारी शेजारी होती त्यामुळे अनेक वेळा बाबा आगेने त्यांच्यात मध्यस्थी केली होती हा मध्यस्थी का करतो असं सुरुवातीपासूनच नारायण फळ याला संशय होता यातूनच सदरील घटना घडली. अधिक तपास माजलगाव पोलीस करत आहेत.