सोलापूर-महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी डोक्यात स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली असती माहिती आहे. त्यांनी हजारो व्याधीग्रस्थांना जीवन दान दिले आहे.
डॉ शिरीष वळसंगकर यांनी UK मधून MRCP (Neruo) केले. सोलापूरातील पहिले आणि ( महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक सीमेवरील एक नामवंत न्यूरोफिजिशियन होते. त्याचे वडील डॉ पद्माकर वळसंगकर हे ही त्याच्या पिढीतील नामवंत व गरीबाचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते.त्यांचाच वारसा राजकारणा पासून अलिप्त राहून डॉ.शिरीष चालवीत होते.
अत्यंत मितभाषी, संयमी, वैद्यकीय सेवेत प्रवीण होते. डॉक्टर पेशंट संबंध कसे असावेत हे सरांकडून शिकण्यासारखे होते.
सरांची मिसेस डॉ उमा या स्त्रीरोग तज्ज्ञ, मुलगा डॉ अश्विन ही मेंदूरोग तज्ज्ञ, सून डॉ शोनाली मेंदू सर्जन आहेत.

