परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक

18 जागेसाठी 28 एप्रिलला मतदान तर 29 रोजी होणार मतमोजणी, 2166 मतदार

एम एन सी न्यूज नेटवर्क :- परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम दि. 27 मार्च 2023 ते 3 एप्रिल 2023 रोजी पर्यत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 18 सदस्य पदांच्या जागेसाठी 2166 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती परळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी दिली आहे.

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून संचालक मंडळाच्या एकूण 18 जागेसाठी निवडणूक होणार आहे. दि. 27 मार्च ते दिनांक 3 एप्रिल 2023 पर्यंत या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रांची सूची जसे जसे उमेदवारी अर्ज प्राप्त होतील त्यानुसार दररोज सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात येईल. प्राप्त अर्जांची छाननी 5 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 पासून छाननी संपेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे. वैद्य नामनिर्देशन पत्रांची सूची 6 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटचा दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी असून सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. अंतिम यादीतील उमेदवारांना यादी प्रसिद्ध करण्यासोबत निवडणूक निशाणीचे वाटप दि. 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. मतदान दि. 28 एप्रिल 2023 रोजी सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत करता येणार आहे. तसेच मतमोजणी दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान दि. 29 एप्रिल 2023 रोजी उशिरापर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

या संदर्भात परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परळी तहसीलचे तहसीलदार सुरेश शेजुळ काम पाहणार असून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीडचे अमृत जाधव हे सहाय्यक म्हणून त्यांना सहकार्य करतील.

@@@@@@

मतदारसंघनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
1)सोसायटी मतदार संघ

सर्वसाधारण प्रवर्ग=7
महिला सदस्य =2
विमुक्त जाती/भटक्या जमाती =1
इतर मागासवर्गीय =1

2)ग्रामपंचायत मतदार संघ
सर्वसाधारण प्रवर्गासाठी =2
अनुसूचित जाती जमाती=1
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक=1

3)व्यापारी मतदारसंघ
व्यापारी मतदारसंघातून 2 सदस्य निवडले जाणार आहेत.4) हमाल मापाडी मतदारसंघ
हमाल मापाडी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे.
एकूण सदस्य संख्या =18

एकूण मतदार संख्या=2166

—————————-

मतदारसंघ निहाय मतदान
1)सोसायटी मतदारसंघ- 650
2)ग्रामपंचायत मतदार संघ=862
3)व्यापारी मतदारसंघ=382
4)हमाल मापाडी मतदारसंघ =272

———————————