डॉ. मॅथ्यू यांचे निधन

🔷 भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक म्हणून ओळखले जात

मुंबई : भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात हृदयविकारतज्ज्ञ डॉ. मॅथ्यू सॅम्युएल कालारिकल यांचे शुक्रवारी निधन झाले.

चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात अल्पशा आजाराने त्यांचा मृत्यू झाला. ते ७७ वर्षांचे होते. डॉ. मॅथ्यू सॅम्युएल कालारिकल  निधनाने वैद्यकीय विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुंबईतील दोन मोठ्या रुग्णालयात ते नेहमी येत असत. यात प्रामुख्याने लीलावती आणि रिलायन्स रुग्णालयात ते रुग्णांना उपचार देण्यासाठी नियमित येत होते.