🔷 पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना दिली आरोग्यसेवा
पुणे– श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विध्यमाने विविध ६४ विभागांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिरात सुमारे १२ हजार ७०० रुग्णांची विनामूल्य तपासणी व उपचार करण्यात आले.
या वेळी पुणे शहरासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या विविध तपासण्या करून औषधे वाटप करण्यात आले. याकरिता ५९ रुग्णालये आणि ५ संस्थांचे ४०५ तज्ञ व कार्यकर्ते यांनी शिबिरात सेवा दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण आणि आरोग्य या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न ट्रस्ट करीत आहे. या माध्यमातून हजारो नागरिकांना दिलासा देण्याचे काम करण्यात आल्याचे या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले तर ट्रस्टच्या वतीने आरोग्य सेवा समन्वयक म्हणून राजेंद्र परदेशी यांनी काम केले. या वेळी रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला.

