ट्रॅक लेवल चाचणी, बीड ते वडवणी धावले इंजिन

परळी बीड अहिल्यानगर अहमदनगर रेल्वे मार्ग

बीड-एम एन सी न्यूजनेटवर्क-  सुमारे 30 वर्षापासून येणार आणि अतिशय संथ गतीने काम चालू चालू असलेल्या परळी बीड अहिल्यानगर रेल्वे मार्ग वरून बीड ते वडवणी दरम्यान ट्रॅक लेव्हलिंग इन्स्पेक्शन साठी इंजिन धावले आहे.  अहिल्यानगर- बीड- परळी रेल्वे मार्गाचे कंक चालू आहे.  रविवारी बीड ते वडवणी या दरम्यान पूर्ण झालेल्या रेल्वे पटरीची लेव्हल इन्स्पेक्शन चाचणी पार पडली. या चाचणीमुळे वडवणी तालुक्यात पहिल्यांदाच इंजिनचा आवाज नागरिकांच्या कानी पडला आणि अनेकांची उत्सुकता वाढीस लागली.

नगर -बीड – परळी रेल्वे मार्गाची गेली अनेक वर्षांची मागणी बीडकरांची होती. अनेक आंदोलने आणि सातत्याने पाठपुरावा करुन राज्य व केंद्र सरकारच्या समान हिश्श्यांच्या वाटणीनंतर या कामाला गती मिळाली आहे. माजी खा. प्रीतम मुंडे, विद्यमान खा. बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे सध्या रेल्वे कामाने थोडीशी गती घेतली आहे.

नगर ते आष्टीपर्यंत रेल्वे सेवा सुरु झाली होती. त्यानंतर विघनवाडी, आणि बीडपर्यंत हायस्पीड चाचणी काही महिन्यांपूर्वी पार पडली होती. त्यानंतर बीड ते वडवणी दरम्यान रेल्वे रुळ अंथरण्याचे काम गतीने सुरु केले गेले होते. आता बीड ते वडवणी या दरम्यान रेल्वे रुळ अंथरुण पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या अंतरावर रविवारी ट्रॅक लेव्हल इन्स्पेक्शन साठी रेल्वेच्या इंजिनची कमी गतीने चाचणी घेण्यात आली. सुमारे दहा ते वीस किमी प्रति तास या वेगाने ही चाचणी पार पडली. रेल्वे रुळांच लेवल त्रुटी आणि काही तांत्रिक अडचणी आहेत का हे या चाचणीत तपासल्या गेले  यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

बीड ते वडवणी दरम्यान  पहिल्यांदाच या भागात रेल्वे इंजिन आणि त्याचा आवाज ऐकून अनेकांनी मोठी गर्दी केली होती. रेल्वे इंजिन धावल्यामुळे ते पाहण्यासाठी मार्गातील गावानजीक नागरिकांनी गर्दी केली.