दिल्ली पोलिसां समोर हजर व्हा; पूजा खेडकरला आदेश

🔻नागरी सेवा परीक्षा 🔻फसवणूक प्रकरण

नवी दिल्ली – भारतीय प्रशासनिक सेवेतील (आयएएस) माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला  नागरी सेवा परीक्षेत फसवणूक व इतर मागासवर्ग (ओबीसी) तसेच दिव्यांगता श्रेणीअंतर्गत आरक्षणाचा चुकीचा लाभ घेतल्याच्या प्रकरणी २ मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर हजर राहण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

न्या. बी. व्ही. नागरत्ना व न्या. ‘सतीश चंद्र शर्मा यांच्या पीठाने म्हटले आहे की, पुढील सुनावणी २१ रोजी होणार असून, तोपर्यंत खेडकर विरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये. या प्रकरणात कोणताही ठोस तपास झालेला नसून, दिल्ली पोलिसांनी वेगाने तपास पूर्ण करण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला.