९ फूट लांबीची धामीन सर्पमित्र नितीन गायकांबळे यांनी पकडली

🔺धामीन 🔺सर्पमित्र 

बीड/परळी-वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क: तीव्र तापमानामुळे आता सरपटणारे प्राणी ही नाल्या आणि पाणथळ जागी आसरा घेत आहेत. साप इकडून तिकडून जातानाच ते लोकांच्याही नजरेस पडत असल्यामुळे नागरिकात घबराट होत आहे.

तप्त हवामानामुळे अनेक सरपटणारे जीव उष्णतेपासून वाचण्यासाठी पाण्याच्या जागा जवळ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परळी शहरातील धनंजय आरबुने यांच्या घराच्या कंपाउंड लगत असलेल्या नाल्यातील बिळात सुमारे नऊ ते दहा फूट लांबीची धामीन आज दिसून आली. यावेळी सर्पमित्र नितीन गायकांबळे यास तात्काळ फोन लावून बोलावून घेतले. त्यांनी येऊन ही धामीन आपल्या ताब्यात घेतली. बिळातून तिला बाहेर काढताना तिला थोडसं खरचटल तेव्हा दया भावनेने तिच्यावर हळद उपचार करून तिला पुन्हा दूर वणामध्ये सोडनार असल्याचे त्यांनी सांगितल.

तर नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा साप दिसून आल्यास त्याला मारू नका अशी विनंती ही त्यांनी यावेळी केली.