महात्मा बसवण्णांच्या ९२० व्या जयंतीनिमित्त २५ रोजी पत्रकार भवनात कार्यक्रम

🔶 महात्मा बसवण्णां जयंती

बीड/परळी: लिंगायत धर्माचे संस्थापक, क्रांतिवीर युगपुरुष महात्मा बसवण्णा यांची ९२० वी जयंती २५ एप्रिल रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे साजरी होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन हे करणार आहेत. या वेळी विशेष अतिथी म्हणून औष्णिक विद्युत केंद्र, परळीचे सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड उपस्थित राहणार आहेत.

“नागवंशी बसवण्णांची कालजयी वचन संपदा आजही दिशादर्शक आहे”, या विषयावर मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक ओमप्रकाश बुरांडे हे मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी राजू कोकलगावे, आत्मलिंग शेटे, संजय खाकरे, ए. तु. कराड सर, चेतन सौंदळे, ॲड. मनोज संकाये, धनंजय आरबुने, धनंजय आढाव, महादेव इटके, नितीन स्वामी, अश्विन मोगरकर, दत्ता शिवगण, ॲड. रमेश आप्पा साखरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आयोजित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भगवान साकसमुद्रे, रानबा गायकवाड, आकाश देवरे व नितीन ढाकणे यांनी केले आहे.