परळी जुगार अड्ड्यावर छापा 17 लाख 93 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त

एम एन सी न्यूज नेटवर्कपरळी – शहरात हमालवाडी या भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरजकुमार यांच्या पथकाने दि.29 मार्च 2023 रोजी धाडसी कारवाई करत तब्बल 17 लाख 93 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जुगार खेळणाऱ्या 29 जनाविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कारवाईत परळी शहर व तालुक्यातील तसेच बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यातील अनेक जुगारी ताब्यात घेतले आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे परळी शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांता गोसावी हे करीत आहेत.

याबाबत परळी शहर पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की, दि 29 मार्च 2023 रोजी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक श्री. धीरज कुमार यांना मिळालेल्या गोपनिय बातमी वरून पोलीस स्टेशन परळी शहर हद्दीमध्ये हमालवाडी येथे जुगार अड्यावर कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यात जुगार खेळणाऱ्या 29 जुगार यांना ताब्यात घेत तब्बल 17 लाख 93 हजार 270 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील कारवाई सहायक पोलीस अधीक्षक धीरज कुमार व उपविभागीय कार्यालयाच्या पथकातील सपोनि अविनाश राठोड, पो.ना. अशोक नामदास, पो.कॉ. गणेश नवले, पो.कॉ. संतराम थापडे, पो. कॉ. युवराज चव्हाण,पो.कॉ तुकाराम कानतोडे यांनी केली आहे.याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात सपोनि अविनाश राठोड यांच्या फिर्यादीवरून
आरोपी 1) बाळासाहेब महादेव बळवंत रा.हमालवाडी ता. परळी २) ज्ञानोबा ऊर्फ बापु अनंतराव नागरगोजे रा. शिवाजीनगर परळी ३) दिलीप रामराव गडम (लातुरकर) रा. विश्वराज सिटी लातुर ता.जि.लातुर ४) विठठल गणपतराव भुसेवाड, रा. उत्तर त्रिमुर्ती नगर परभणी ता. जि. परभणी ५) नासेर शेरखान पठाण रा. मलीकपुरा परळी ता. परळी ६) सय्यद अमिर सय्यद जाफर, रा. पोठ मोहल्ला परळी ता. परळी ७) बाळु सर्जेराव अल्हाट, मोगरा ता. माजलगाव जि.बीड ८) नामदेव तुकाराम कराड, रा. इंजेगाव ता. परळी जि.बीड ९) देवराव लक्ष्मण शिंदे, रा. लोणी ता. परळी जि.बीड १०) पांडुरंग राघोबा काळे, रा. सिरसाळा ता. परळी जि.बीड ११) चेतन त्रिवक महाजन रा. महाजन गल्ली सोनपेठ ता. सोनपेठ जि. परभणी १२ ) व्यंकटी युवराज राजळे, रा. बोर्डा ता. गंगाखेड जि. परभणी १३) रतन रघुराम हजारे रा. डिघोळ ता. सोनपेठ जि.परभणी १४) सुभाष गोपीनाथ जाधव रा. डिघोळ ता. सोनपेठ जि.परभणी १५) बापुराव रामभाऊ वगरे रा. शिंदेवाडी ता. माजलगाव जि.बीड १६) बळीराम हरीभाऊ चव्हाण रा. डिघोळ ता. सोनपेठ जि.परभणी १७) शेख बशीर शेख फरीद रा. बियाणी महामंडळ संजय गांधीनगर परभणी ता. जि. परभणी १८) अनिल गंगाधर कांदे रा. कोपरा ता. अहमदपुर जि.लातुर १९) शाम रामभाऊ माने, रा. हमालवाडी परळी ता. परळी जि. बीड २०) वैजिनाथ विश्वंभर सुर्यवंशी रा. कोपरा ता. अहमदपुर जि.लातुर २१) बालाजी सखाराम जाधव रा. वडर कॉलणी परळी ता. परळी जि.बीड २२) मुसाखान शेरखान पठाण रा. कोमटवाडी ता. जि. परभणी २३) मासुम हमीद पठाण रा. पोखणी ता. जि. परभणी २४) खलील अजेशखॉन पठाण रा. पोखर्णी ता. जि. परभणी २५) रविंद्र सुदार कदम रा. फकीर जवळा ता.धारुर जि.बीड ता. जि. परभणी २६) भारत किसन गायकवाड रा. संगम ता. परळी जि.बीड २७) केशव विश्वंभर बळवंत रा. हमालवाडी २८) रमेश केशव वाघ रा. पोखर्णी ता. जि. परभणी २९) अशोक चंद्रभान बडे रा. खाडेवाडी ता. माजलगाव यांचे विरुध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४.५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि कांता गोसावी हे करत आहेत.