विदर्भ,मराठवाड्यात सूर्यनारायण कोपले, पारा ४५ पार

🔻अतिशय तप्त उन्हाचा कहर, 🔻 ‘हीट वेव्ह’🔻सर्वाधिक उष्ण स्थान जागतिक यादीत पुन्हा ब्रह्मपुरी, चंद्रपूर, अकोला

नागपूर : यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भावर सूर्यनारायणाची दृष्टी  तीव्र दिसून येत आहे. जागतिक सर्वाधिक तपमानाच्या स्थानयादीत विदर्भातील अकोला, चंद्रपूर या शहरांचा अग्रक्रम आहे.

या उन्हाळी हंगामात शहरांशी उष्णतेची स्पर्धाच लागली आहे. सर्वांत उष्ण शहरांमध्ये बुधवारी ब्रह्मपुरी, चंद्रपूर, अकोला शहराने ४५ पार जात उच्चांक गाठला. सूर्याच्या अग्निज्वाळा ओकतो आहे. येणाऱ्या काही दिवसात अधिक तप्त आणि उष्ण लाटेचा सामना करण्याची चिन्हे हवामान विभागाने दिली आहेत. विदर्भातील ब्रह्मपुरी ४५.६ अंशांसह जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले.

🔶 विदर्भातील काही प्रमुख शहरातील उच्च तापमान

चंद्रपूर ४५.५०,ब्रह्मपुरी ४५.६०, अकोला ४५०, नागपूर ४४.४° वर्धा ४४.७०, अमरावती ४४.६०, गडचिरोली  ४४.६०, भंडारा ४३० यवतमाळ ४३०, वाशिम ४३०, गोंदिया ४२.५०