शिक्षण
बीड/परळी वैजनाथ -एम एन सी न्यूजनेटवर्क इंद्रायणी प्रतिष्ठाण संचलित जिजामाता विद्यालय धर्मापुरी या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत रुपये १ लाखाचे रुपयाचे रोख पारितोषिक मिळाले. या शाळेचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
शासनाच्या शिक्षण उपक्रमांतर्गत सन २०२४-२५ या शै . वर्षात जिजामाता विद्यालयाने सहभाग नोंदविला होता. या विद्यालयाला तृतीय क्रमांकाचे रू. १ लाखाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले .
शाळेमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम-उपक्रम राबविण्यात आले. सुंदर परस बागेची निर्मिती, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा, शाळा परिसर स्वच्छता, गावातील रस्ते स्वच्छता अभियान, सुलभ प्रवेश प्रक्रिया, आरोग्य तपासणी, प्रबोधन कार्यक्रम, तक्रार पेटी ,पुस्तक पेढी, स्पर्धा परीक्षा, शासनाच्या विविध योजना, विज्ञान प्रयोग शाळा, सी सी टीव्ही कॅमेरे, स्वच्छता गृह यांसह शासन परिपत्रकानुसार सर्व बाबींची पूर्तता उस्फुर्तपणे करण्यात आली .
प्राचार्य रामहरी गिते यांच्या उपयुक्त नियोजनानुसार शाळेतील प्राध्यापक वृंद, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी एवढेच नव्हे तर परिवहन व्यवस्था सांभाळणारे ॲटो चालक, पोषण आहार कामगार, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांचे दैदिप्यमान सहकार्य तसेच संस्था पदाधिकारी यांची खंबीर साथ आदिं बाबीं मुळे विद्यालयाला हे यश मिळविता आले .
गटसाधन केंद्राचे बालासाहेब दहिफळे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात हा धनादेश प्राचार्य गिते यांना प्रदान करण्यात आला . यावेळी पर्यवेक्षक बी. टी आघाव, प्रा.वि. मुख्याध्यापक हणुमंत कराड, संजय फड यांची उपस्थिती होती.
विद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्ल संस्थेचे सचिव विजय कुमार नागरगोजे, संचालिका डॉ सौ . सरस्वती नागरगोजे व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

