शोभिवंत कुंड्या झाल्या थुंकी पात्र 

एम एन सी न्यूज नेटवर्क -परळी:  पंचायत समितीची इमारत देखणी आणि सुबक असली तरी या इमारतीच्या सुंदरपणात आणखी भर टाकण्यासाठी दालनांत असणाऱ्या शोभिवंत वृक्षांच्या कुंड्या पावलावर लावण्यात आल्या होत्या.

आता या सर्व शोभा वाढवणाऱ्या झाडाच्या कुंड्यांमध्ये थुंकून झाडे वाळून गेली आहेत तर या सर्व कुंड्या थुंकी पात्र झालेल्या दिसून येत आहेत.