जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर; अवैध बॅनर वर कारवाईचे आदेश

बीड, प्रतिनिधी-नव्यानेच आलेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील अवैध बॅनर, होडींग व पोस्टर्स बाबत कार्यवाहीचे आदेश काढले आहेत. उच्च न्यायालयाचे आदेश, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पत्र व प्रधान सचिव (नवि-2)नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामधील निर्देशानुसार कार्यवाही करणे बाबतचेपत्र बीड जिल्हाधिकारी यांनी आज (दि. २८) निर्गमित केले आहे.

जिल्हाधिकारी बीड यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, सद्यस्थितीत बीड जिल्ह्यात विविध सार्वजनिक सण
उत्सव (रमजान ईद, रामनवमी, गुढीपाडवा, शिवजयंती, डॉ. बाबासाहेव आंबेडकर जयंती इत्यादी जयंती यात्रा, ऊर्स,
सप्ताह, जयंती, धार्मिक प्रवक्त्यांचे कार्यक्रम इत्यादी अनुषंगाने सर्व समाज व धर्माच्या लोक संघटना कडून आपापल्या
परीने जिल्ह्यातील विविध चौकात, मुख्य रोडवर, सार्वजनिक ठिकाणी, मिश्र वस्तीत इत्यादी ठिकाणी विविध झंडे
त्यास अनुसरून बॅनर लावण्यात येत आहेत. तसेच सदरचे झेंडे व बनर सण, उत्सव, जयंती, यात्रा ऊर्स संपन्न होऊन बरेच
दिवस झाले तरी ते काढण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बीड जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण होत असून जिल्हयातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग होत आहे…
त्याअनुषंगाने या बाबींचे गांभीर्य लक्षात घेवून अनाधिकृत होडींग्स, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे इ. बाबत तातडीने
आवश्यक ती कार्यवाही अनुसरावी असे पत्र  दि. २८/४/२०२५ जिल्हादंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी निर्गमित
केले आहे.