कोल्हापूरच्या पंचगंगा बँकेचा ५०० कोटी व्यवसायाचा टप्पा पार.

कोल्हापूरच्या पंचगंगा बँकेचा ५०० कोटी व्यवसाय

एम एन सी न्यूज नेटवर्क- कोल्हापूर -आधुनिक बँकिंग चा पुरस्कार करणारी सहकारातली बँक अशी ओळख असणाऱ्या सहकार पंढरी कोल्हापूर येथील श्री पंचगंगा नागरी सहकारी बँकेने ५०० कोटी रुपयाचा मिश्र व्यवसायाचा टप्पा आज पार केला.

आज  २०२२_२०२३ या संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेचा ५१४ कोटीचा व्यवसाय केला आहे. बँकेचा  या संपलेल्या आर्थिक वर्षात ढोबळ नफा ९.६६ कोटी झाला आहे.  ३१ मार्च २०२३ अखेर बँकेच्या ठेवी ३२०.८६कोटी व कर्जे १९३.४६ कोटी वितरित केली असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा सौ माधुरी कुलकर्णी यांनी दिली.

श्री पंचगंगा नागरी सहकारी बँकेने  सातत्याने आपला नेट NPA 0 % टक्के ठेवण्यात यश मिळवले आहे .