मुंबईचे पोलीस आयुक्त फणसळकर सेवानिवृत्त, देवेन भारती नवे आयुक्त

🔶 महाराष्ट्र पोलीस

मुंबई– उल्लेखनीय सेवा बजावणारे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी पोलीस आयुक्त कोण होणारं याकडे मात्र पोलीस दलाचे लक्ष लागले होते. विवेक फ़णसळकर नंतर मुंबईचें नवीन पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारतीय पदभार स्वीकारला आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी अनेकांची नावे चर्चेत होती. त्यात विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, एन आय ए चे प्रमुख सदानंद दाते आदी नावे चर्चेत होती.

मुंबई पोलीस आयुक्तांच्या पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीनंतर आता देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🔷 देवेन भारती यांच्या बद्धल
नूतन मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मुळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. मुंबई डीसीपी झोन नाईन आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केलं. देवेन भारती यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलं. 2014 ते 2019 दरम्यान मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते.

देवेन भारती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख देखील होते. पत्रकार जे डी यांच्या हत्येच्या तपासात देवेन भारतींचा सहभाग होता. मुंबईतील 26/11 च्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा त्यांनी तपास केला.