एम एन सी न्यूज नेटवर्क – परळी: काँग्रेस आय पक्षाचा विद्यार्थी दशेपासुन एकनिष्ठ व सच्छे कार्यकर्ते म्हणुन ओळख असणारे शशीशेखर सुरेश चौधरी यांची परळी शहर काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आले.
नुकतीच शहरात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख व शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची व्यापक बैठक संपन्न झाली. याबैठकीत शशीशेखर सुरेश चौधरी यांच्या यापुर्वीचा आणि असता गायत काँग्रेस पक्ष निष्ठेचा विचार करता त्यांच्यावर शहर कार्याध्यक्षपदाची जवाबदारी सर्वांनुमते देण्यात आली आहे.
कार्याध्यक्षपदी निवडीच पत्र जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख व शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या हस्ते शशीशेखर सुरेश चौधरी यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते सुरेशद्र राजहंस,प्रदेशनेते अँड.अनिल मुंडे उपस्थित होते. शशी शेखर चौधरी यांची शहर काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्या बदल जिल्हा सरचिटणीस ऍड प्रकाश मुंडे, समंदरलाला पठाण, उपाध्यक्ष सुभाष देशमुख, वैजनाथ गडेकर, इत्तेशाम खातिब, सरचिटणीस शिवाजी देशमुख,, प्रवक्ते बदर भाई, कोषाध्यक्ष फरकुंद अली बेग, दीपक शिरसाट, धर्मराज खोसे, अलीम, जावेद, सद्दाम, रसूल खान शरियार, संतोष दौंड,ऋषी लोमटे,अजय पिंपळे, खुद्दुस शेख, रमेश मस्के यांनी अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान या प्रसंगी नूतन कार्याध्यक्ष शशीशेखर चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि विचार नागरिकापर्यंत पोहोचून पक्षाचे कार्य सामान्यांपर्यंत वाढविण्यासाठी आपण सदैव मदत करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.