🔷 घव घवीत यश- 🔶 परिस्थितीशी झुंज
बीड/ केज -एमएनसी न्यूज नेटवर्क– जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी निघृण हत्या करण्यात आली होती. मात्र, या कठीण परिस्थितीमध्येही संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून दाखवले आहे. तिला 600 पैकी 512 मार्क मिळाले आहेत. बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. संतोष देशमुख यांच्या मुलीला इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत.
संतोष देशमुख यांच्या कन्येने त्यांच्या हत्येच्या दोन महिन्यानंतर डोक्यावर दुःखाचा डोंगर असताना 12 बारावीची परीक्षा दिली होती. आज वैभवीने सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे म्हटले. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे असं ती म्हणाली. माझ्या पाठीवर छान मार्क्स मिळविले आहेस,अशी कौतुकाची थाप टाकण्यासाठी आज ते नाहीत याचं मला दुःख आहे.

