योगगुरू स्वामी शिवानंद यांचे निधन

पद्मश्रीने सन्मानित

वाराणसी (उत्तर प्रदेश) :प्रसिद्ध योगगुरू स्वामी शिवानंद यांचे वाराणसी येथील रहिवासी निधन झाले. ते १२८ वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. स्वामीं शिवानंद यांच्या शिष्यांनी दिलेल्या माहितीनुसार , त्यांना ३० एप्रिल रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे काशी हिंदू विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले .

शिष्यांनी सांगितले की, शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी बांगलादेशातील श्रीहट्टा जिल्ह्यात झाला होता. शिवानंद बाबांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर ओंकारानंद यांनी शिवानंद स्वामींची जबाबदारी घेतली. शिवानंद स्वामींना त्यांच्यासोबत राहून ज्ञान आणि शिक्षण मिळाले.योगगुरूंच्या शिष्यांनी सांगितले की, स्वामी शिवानंद यांना २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बाबांची दिनचर्या व आहार हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य होते. ते नियमितपणे पहाटे ३ वाजता उठून योगा करायचे.