🔶 गुणवत्तापूर्ण शिक्षणासह यशस्वी परंपरा कायम
बीड/परळी वैजनाथ-एम एन सी न्यूजनेटवर्क -शहरातील एक अग्रण्य शैक्षणिक संस्था म्हणून ओळखले जाणारे डॉ. झाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित,डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परळी वै. यंदाच्या (2024-25) बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखा 98.00% व कला शाखेचा 91.00% एकूण = 94.38%निकालासह उत्तुंग यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. या वर्षी एकूण 89 विद्यार्थ्यांपैकी 88 विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले होते, आणि त्यापैकी तब्बल 84 विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
या यशामध्ये कला शाखेतील विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्यासह यश मिळवत महाविद्यालयाचा सन्मान वाढविला आहे. त्या विद्यार्थिनी म्हणजे –
🔷कला शाखा – शेख अल्फिशर जब्बार, शेख जवेरीया फातिमा इरफान.
🔷विज्ञान शाखा– शेख जुफशा अहमद, शेख आयशा समद
या गौरवशाली यशाबद्दल डॉ. झाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी वाहाजोद्दीन मुल्ला साहेब व उच्च माध्यमिक च्या प्राचार्य पठाण मुनवरी बेगम साहेबा, प्राथमिक च्या मुख्याध्यापिका सिद्दिकी जरीना नाहीद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. शाळेच्या इतर सर्व सदस्यांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशावर आनंद व्यक्त केला आणि हे संस्थेच्या शैक्षणिक धोरणांची ही सकारात्मक फलश्रुती असल्याचे सांगितले.
प्राचार्य पठाण मुनवरी बाजी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत, कठोर परिश्रम, नियमित मार्गदर्शन आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केल्याने हे यश प्राप्त झाले आहे असे सांगितले. डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सिद्दिकी जरीना नाहीद बाजी यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विद्यालयातील समर्पित शिक्षकवर्ग, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करत यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. सोसायटीचे अध्यक्ष, प्राचार्य व सर्व शिक्षकवर्ग सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सजग राहतात आणि त्यांच्यात आत्मविश्वास व प्रगतीची जिद्द निर्माण करतात. या घवघवीत यशामुळे डॉ. झाकीर हुसेन उच्च माध्यमिक विद्यालय परळी शहरातील एक आदर्श शिक्षणसंस्था म्हणून पुढे येत आहे आणि भविष्यातही असेच यश मिळवत राहील. यशाची उज्वल परंपरा कायम राखत आहे.

