पुण्यात सुमारे दहा लाखांचे मेफेड्रोन जप्त

अमली पदार्थ 🔷 विक्रीकरण्यास आलेला राजस्थान तरुन ताब्यात 

पुणे –  शिक्षण, नोकरी या यासाठी पुण्यात बाहेरून येणाऱ्या युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. घरापासून दूर असणारी ही तरुण पिढी अमली पदार्थ व ईतर गोष्टी द्वारे व्यसनी होत असल्याची मागील अनेक कारवाईत पकडलेल्या अमली पदार्थवरुन लक्षात येत आहे.

पुणे शहरातील कोंढवा भागात  मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या तरुणाला पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून पावणेदहा लाख रुपयांचे मैफेड्रोन, मोबाइल, एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनेश मानाराम देवासी (हल मुक्काम १९, रा. घोरपडी, मूळ रा. राजस्थान) असे आहे. देवासी याच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्री प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेफेड्रोन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून सुमारे ४४ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची बाजारतील किंमत पावणेदहा लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने संबंधित अमली पदार्थ कोठून आणले आहे, ते पुणे शहरात कुठे,कोणाला विक्री करणार होता तसेच त्याचे अन्य साथीदारांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.