🔶धार्मिक 🔶 भक्त आणि भक्ति
पंढरपूर-येथील रहिवासी असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सीम भक्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस सोन्याच्या तुळशीमाळेला ४३ पाने व ८८ व्हर्टिकल मणी अर्पण केले आहेत. मंदिर समितीने दिलेल्या माहिती नुसार श्रीमती अलका अंकुश घाडगे (रा. आनंदनगर, टाकळी रोड, पंढरपूर) यांनी श्रींच्या चरणी सुमारे ५ लाख रुपये किमतीची सोन्याची तुळशीमाळ अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. या माळेचे अंदाजे वजन ६०.७८ ग्रॅम असून ५ लाख १४ हजार इतकी किंमत आहे. देणगीदार हे पंढरपूर येथील रहिवासी आहेत.
सोने-चांदी देणगी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. त्यासाठी अनुभवी व तज्ज्ञ सराफाची नियुक्ती करण्यात आली आहे. सोने-चांदी देणगी देणाऱ्या भाविकांना संगणकीय प्रणालीद्वारे पावती देण्यात येते. इच्छुक भाविकांनी मंदिर समितीच्या कार्यालयात् संपर्क करावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने या वेळी श्री श्रोत्री यांनी केले.

