बीड /अंबाजोगाई- अंबाजोगाई नजीकच्या बनसरोळा येथील जनविकास महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख असिफ सरदार याने नुकताच जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत 71.17% गुण मिळवून यश मिळवले आहे. असिफ नेहे यश अतिशय कष्टप्रद असणाऱ्या आपल्या परिस्थितीतून मिळवले आहे. असिफ ने बनसरोळा येथील बस थांब्यावर किंवा परिसरात आईस्क्रीम, खारे शेंगदाणे आदि वस्तू विकून आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत करत हे यश मिळवल आहे.
बारावीच्या या परीक्षेसाठी त्याने कुठलीही ट्युशन लावली नाही की कुठलाही क्लासला त्याला जाण शक्य झालं नाही.जे काही गुण मिळवली ती स्व कष्टाने त्याने मिळविले आहेत.
त्याच्या या गुणाचं कौतुक व्हावं म्हणून समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या बीड जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा साहेला जिलानी यांनी आपल्या कार्यालयात त्याचा गौरव केला. व त्यास पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी असिफ चे आई-वडील तसेच समाजवादी पार्टी अंबाजोगाई तालुका अध्यक्ष शेख जिलनी उपस्थित होते.

