🔷 तुळजापूरसाठी १,८६५ कोटी, 🔷 माहूरगडासाठी ८२९ कोटी 🔷अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी ६८१ कोटी
अहिल्यानगर-चौंडी : तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास १,८६५ कोटी आणि
माहूरगड विकासासाठी ८२९ कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंगळवारी चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे झालेल्या ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक विकास आराखड्यासाठी ६८१ कोटी आणि राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांसाठी एकूण साडेपाच हजार कोटींची तरतूद, अहिल्यानगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महिलांसाठी आदिशक्ती पुरस्कार, धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी
यशवंत विद्यार्थी योजना आणि वसतिगृहे अशा योजनांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक मंगळवारी चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार,अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,संयोजक विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह विविध मंत्री,सचिव व अधिकारी उपस्थित होते.
🔶 एकूणच राज्यातील विविध ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राज्य सरकारने तयार केला असून, त्यासाठी एकूण ५,५०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली.
🔶 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, चौंडी : ६८१ कोटी
🔶 अंबाबाई मंदिर, कोल्हापूर : १, ४४५ कोटी
🔶 जोतिबा मंदिर, कोल्हापूर : २५९ कोटी
🔶 तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर : १,८६५ कोटी
🔶 त्र्यंबकेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर : २७५ कोटी
🔶 अष्टविनायक तीर्थक्षेत्रे : १४७ कोटी
🔶 माहूरगड तीर्थक्षेत्र : ८२९ कोटी

