
PM मोदी CBI ला म्हणाले – एकही भ्रष्ट सोडू नका, कारवाई होणारे खूप ताकदवान, पण कर्तव्यावरून लक्ष ढळू देऊ नका –
दिल्ली – सोमवारी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित हीरक महोत्सवी कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. यावेळी आपल्यासुमारें अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी CBI चा ६ दशकांचा प्रवास व भविष्यातील आव्हानांवर चर्चा केला.
गेल्या सहा दशकात सीबीआयने मल्टी डायमेन्शन आणि मल्टी डिसिप्लिनरी तपास एजन्सी च्या स्वरूपात आपली ओळख निर्माण केली आहे. अनेक बँक फ्रॉड आणि जंगल संपत्ती वाइल्डलाइफशी संबंधित अपराधी आणि त्यांच्याशी संबंधित प्रकरणात, ऑर्गनाइज्ड क्राईम ते सायबर क्राईम याचेही प्रकरणे सीबीआय पाहत आहे.
मुख्य तो सीबीआयची जिम्मेदारी देशाला भ्रष्टाचार तून मुक्त करण्याची आहे, भ्रष्टाचार करप्शन हा काही साधा अपराध नसून भ्रष्टाचारामुळे सर्वसाधारण नागरिकांचे हक्क हिसकावले जातात. भ्रष्टाचारामुळे अनेक अपराध आणि अपरराधाची साखळी निर्माण होते. अनेक गुन्ह्याचे मूळ भ्रष्टाचार असून लोकशाही आणि न्याय व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा अडथळा भ्रष्टाचारच आहे. जेव्हा सरकारी यंत्रणेत भ्रष्टाचार हा हावी असतो तेव्हा तो लोकशाहीला फळू फुलू देत नाही. भ्रष्टाचारामुळे मुख्यतः तरुणांन आणि युवकांच्या स्वप्नाचा बळी जातो त्यांना योग्य ती संधी मिळत नाही. भ्रष्टाचारामुळे परिवार वाद आणि नातेसंबंधा सह अधिक भ्रष्टाचार वाढण्यास बळ मिळते.
यावेळी पंतप्रधान आपल्या मनोगतात पुढे CBI ला उद्देशून म्हणाले की, ‘तुम्हाला कुठेही थांबण्याची गरज ते नाही. तुम्ही ज्यांच्यावर कारवाई करत आहात, ते खूप ताकदवान लोक असल्याचे मला माहिती आहे. ते लोक वर्षानुवर्षे सरकार व व्यवस्थेचे घटक होते. आजही ते विविध राज्यांच्या सत्तेत सहभागी आहेत. पण तुम्हाला आपल्या कर्तव्यावरून लक्ष ढळू द्यायचे नाहीये.
(पी एम इंडिया न्यूज अपडेट)

