🔶 दू:खद 🔶 अपघात
बीड/ परळी -वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर येथील वाण धरणात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि ७ रोजी घडली. घटनेची माहिती मिळताच परळी नगर परिषदेच्या आपत्ती विभाहाचे प्रमुख सुनील आडोदे आणि त्याच्या सहकार्यांनी घटनास्थळी दाखल होत शोध कार्य करून मयत मुलास बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार परळी शहरातील बरकत नगर येथील शेख मुजमिल शेख खय्युम (वय १७) मुलगा बुधवार दि ७ रोजी सकाळी ११ च्या सुमारास पोहण्यासाठी नागापूर येथील वाण धरण परिसरात गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने
पाण्यात उतरलेल्या या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मि ळताच परळी नगर परिषदेच्या आपत्ती विभागाचे प्रमुख सुनील आडोदे, गोविंद गित्ते, नितीन जगतकर, निखिल गोदाम,तेजस घुले, विठ्ठल गित्ते यांनी शोध कार्य सुरू करत अर्ध्या तासात बुडीत मयत मुलाला शोधून बाहेर काढले. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

