🔷 एच.एस.सी.परीक्षेत उज्ज्वल यश संपादन मिळवलेले गुणवंत
बीड/परळी वै.एम एन सी न्यूज नेटवर्क –डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रचार्या पठाण मुनवरीबेगम हसन खान हे मंचावर उपस्थितीत होते. तसेच माध्यमिक विद्यालयाचे सह शिक्षक परवेज देशमुख सर, प्रा.शेख मुशीर अहेमद प्रा.सय्यद सबाहतअली सर, प्रा.शेख मसूद सर, प्रा. मोहमद आसरार सर, प्रा. पठाण फरहत बाजी, सरताज सर, युसूफ चाचा, व पालक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सय्यद सबाहत सर यांनी केले. त्यानंतर एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करत स्वतःसह उच्च माध्यमिक विध्यालायचे नावलौकिक करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी पालकांसह सत्कार करण्यात आला. विज्ञान शाखेतून यावर्षी सर्व प्रथम येण्याचा मान कु. शेख झुफशा अहमद हिने विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होत 76. 00 % प्राप्त केला. तर द्वितीय कु.शेख आयशा समद 73.67% व तृतीय कु.शेख लुबानाज युनूस 71.73% व कला शाखेतून प्रथम येणायचा मान शेख अल्फिशर जब्बार 81.83%, दुतीय शेख जवेरिया फातेमा इरफान 69.17% तृतीय कु. कुरेशी अनम फातिमा अब्दुल रहीम 66.33% या विद्यार्थीनींचा सत्कार मंचावर उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावर्षी एकूण 89 विद्यार्थी एच.एस.सी.बोर्ड परीक्षेस प्रविष्ठ झाले होते त्यांपैकी 88 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पैकी
प्रथम श्रेणीत 32 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 43 तर 2 विद्यार्थी विशेष प्रवीण्यासह उत्तीर्ण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभास डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या पठाण मुनवरी बेगम हसन खान यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच डॉ. झाकीर हुसैन उर्दू उच्च माध्यमिक विद्यालयाती सर्व प्राध्यापक, माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. डॉ. झाकीर हुसैन एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष हाजी वाहजुद्दीन मुल्ला साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

