एम एन सी न्यूज नेटवर्क -परळी-कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून २८ एप्रिल २०२3 रोजी मतदान होत आहे. २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निमित्ताने भाजपाच्या राष्ट्रीय महासचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा समोरा-समोर येत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या १८ जागांसाठी दि. ३ एप्रिल २०२३ रोजी पर्यंत १२६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.
राज्यात आणि जिल्ह्याच्या राजकिय क्षेत्रात परळी नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. परळी मतदारसंघामध्ये विधानसभा असो की, अन्य कोणत्याही निवडणुका यामध्ये मुंडें विरुद्ध मुंडे अशीच लढाई झालेली आहे. नुकत्याच संपलेल्या परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाच्या कार्यकाळात १८ पैकी १४ संचालक आ. धनंजय मुंडे गटाचे निवडून आले होते. तर पंकजा मुंडे गटाचे चार संचालक निवडून आले होते.
◾परळी कृ.ऊ.बा. समिती निवडणुक प्राप्त मतदारसंघनिहाय नामनिर्देशनपत्र पुढीलप्रमाणे
१ सोसायटी मतदार संघ
सर्वसाधारण प्रवर्ग= ५८
महिला सदस्य = १०
विमुक्त जाती/भटक्या जमाती व भटक्या किंवा वि.मा.प्र = ६
इतर मागासवर्ग प्रवर्ग= ६
२)ग्रामपंचायत मतदार संघ
सर्वसाधारण प्रवर्गासाठी = ७
अनुसूचित जाती = १३
अनुसूचित जाती जमाती= ६
आर्थिक दृष्ट्या दुर्बल= ६
३)व्यापारी मतदारसंघ
व्यापारी मतदारसंघ= ११
४) हमाल मापाडी मतदारसंघ= ९
हमाल मापाडी
एकूण= १२६
◼️ निवडणुकी साठी १२६ अर्ज दाखल
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत १२६ नामनिर्देशन पत्र विविध राजकीय पक्षांच्या वतीने दाखल करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना शिंदे गट,अपक्ष यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.