◾ लाख 13 हजार रुपयाच्या मुद्देमाल, 11 जनाविरुद्ध कारवाई.
◾ स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शहरात मोठी चर्चा
एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी- शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. साधारण आठ दिवसापूर्वीच त्यांनी एक मोठी कारवाई करून सुमारे 29 जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांना यांना ताब्यात घेतले होते. या कारवाईची चर्चा थांबते ना थांबते तोच पुन्हा परळी शहरातील भारती मठ नावाच्या ठिकाणी तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या पथकाने धाड टाकत परळी शहर व तालुक्यात अवैध धंद्यावाल्या विरोधात कारवाईचा धडाका सुरूच केली आहे. दि. 7 एप्रिल 2023 रोजी एका जुगार अड्ड्यावर धाडसी कारवाई करीत सुमारे ५ लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या 11 जुगाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत परळी शहर पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहिती अशी की, सहायक पोलीस अधीक्षक डी.बी. धीरज कुमार यांच्या पथकाने परळी शहर हद्दीमध्ये भारती मठ परिसरामध्ये येथे तिरंट नावाचा जुगार खेळणाऱ्या 11 जणांविरुध्द कारवाई केली आहे. दि. 07/04/2023 रोजी दुपारी 4.15 वा सदरील कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रोहीत जितेंद्र मोदी हा परळी शहरातील भारती मठाच्या परिसरामध्ये पत्र्याच्या खोलीमध्ये तिरंट नावाचा जुगारचा क्लब चालवित असल्याची माहिती मिळाल्याने सहायक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय कार्यालयाचे सपोनि अविनाश राठोड, पो.ना. अशोक नामदास,पो.कों. गणेश नवले, पो. कॉ.. संतराम चापडे, पो.कॉ. युवराज चव्हाण, पो. कॉ तुकाराम कानतोडे यांनी ११ जुगार खेळणारे आरोपी विरुद्ध कारवाई केली.
या प्रकरणांत त्यांच्या ताब्यातून 5 लाख 13 हजार 60 रुपये चा मुध्येमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईत खालील प्रमाणे आरोपी आढळून आले आहेत. १) रोहीत जितेंद्र मोदी, वय ३१ (रा. राजपुत गल्ली,परळी) २) श्रीकृष्ण शिवाजी गुटटे, वय ३२(मांडवा सध्या रा. थर्मल कॉलणी परळी) ३) प्रताप आण्णासाहेब देशमुख, वय ५१ (रा. नवगन कॉलेज जवळ, परळी) ४) वाल्मीक बळीराम मुंडे, वय ४९ (रा. एरीगेशन कॉलणी परळी) ५) उत्तम नारायण तट, वय ६५,(रा. शारदा नगर,परळी) ६) विकास राजाराम जाधव, वय ३८ (रा. वडार कॉलणी,परळी) ७) बालु रंगनाथ राठोड, वय २७ ( रा. वसंतनगर तांडा, परळी) ८) वैजिनाथ रंगनाथ राठोड, वय २५ (रा. वसंतनगर तांडा) ९) रघुनाथ विजय रॉय, वय ३९ (रा. नाथ टॉकीज जवळ, नाथ रोड,परळी) १०) शिवराज सखाराम काळे, वय २१ (रा. चांदापुर) ११) शिवाजी उत्तम धोतरे, वय ३७ (रा. वडार कॉलणी परळी) असे मिळून आले असून त्यांचे विरुध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4.5 प्रमाणे सपोनि अविनाश राठोड यांचे फिर्यादी वरुन परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.