महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त थर्मल कॉलनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

मी सावित्री बोलतेय हा एकपात्री प्रयोग ,भीमयुग या नाटकाचा प्रयोग, प्रा नागेश जोंधळे, प्रा आर एस यादव यांचे व्याख्यान

परळी/ एम एन सी न्यूज नेटवर्क– क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त शहरातील शक्तीकुंज वसाहत औष्णिक वीज निर्मिती केंद्रांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा जोतीराव फुले यांची 196 जयंती 11 एप्रिल रोजी तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती 14 एप्रिल रोजी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील शक्तीकुंज वसाहतीत साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सव समिती थर्मल यांच्यावतीने दिनांक 11 एप्रिल रोजी सविता राऊत यांचा होय मी सावित्री बोलतेय हा एकपात्री प्रयोग सायंकाळी सहा वाजता तर महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रा. नागेश जोंधळे यांचे महात्मा फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्रांती या विषयावर सायंकाळी 7 वाजता व्याख्यान होणार आहे.

दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता लेखक रानबा गायकवाड तसेच दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित भीमयुग या नाटकाचा प्रयोग होणार आहे. दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता धम्मरली सकाळी 10 वाजता मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना आणि सकाळी 11 वाजता प्रसिद्ध प्रबोधनकार वक्ते प्रा. आर. एस ‌. यादव यांचे व्याख्यान पार पडणार आहे. उपमुख्य अभियंता एच के अवचर, अधीक्षक अभियंता एस.एन.बुकतारे , आर.पी.रेड्डी, एस.एम.नागरगोजे , एस.जी.रामोड, सी. ए. मोराळे, वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे, कल्याणअधिकारी दिलीप वंजारी , शिवाजी होटकर,आर एस कांबळे,सर्व विभाग प्रमुख ,संयुक्त जयंती उत्सव समितीचे सचिव प्रदीप चव्हाण यांच्या उपस्थितीत सम्राट अशोक सभागृह प्रांगण शक्तीकुंज वसाहत थर्मल कॉलनी परळी येथे संपन्न होणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सव समिती थर्मल यांच्यावतीने करण्यात आले आहे.