महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त प्रतिभा शोध परीक्षा उत्साहात संपन्न

बंसल कोचिंग क्लासेस व जयंती उत्सव समितीचा संयुक्त उपक्रम

परळी- एम एन सी न्यूज नेटवर्क- महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रतिभा शोध परीक्षा (Talent Search Exam) दि. ९ एप्रिल रोजी रविवार प्रेरणा वाचनालय, शक्ती कुंज वसाहत, परळी येथील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता एस. एन. बुकतारे तर प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता धनंजय कोकाटे, पत्रकार भगवान साकसमुद्रे, शाखा व्यवस्थापक विनोद दराडे, भगवान मुंडे सर (डिजीटल क्लास मॅनेजर,) सोनाली लव्हारे मॅडम (क्रिएटिव किड्स एजुकेशन मॅनेजर) अर्चना कातकडे, रुपाली मुंडे, माधवी चौधरी, निलम जैन, कल्पना कांबळे, दिप्ती टपके, अनिता बिडगर बंसल क्लासेस क्रिएटिव किड्स एजुकेशन सहाय्यक आदींची उपस्थिती होती. या परिक्षा थर्मल कॉलनी शक्तिकुंज व बन्सल क्लासेस व सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या.

वसाहतीतील विद्यार्थ्यांसाठी Talent Search Exam
इयत्ता 1 ली ते 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थी सहभागी परीक्षेत गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना बन्सल क्लासेस मध्ये प्रवेश घेताना जवळपास 100% शैक्षणिक स्कॉलरशिप दिली जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवर्धन सूर्यवंशी यांनी केलेसदरील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.