सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस

सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे विशेषत: आध्यात्मिक पर्यटनाला फायदा होईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल: पंतप्रधान

वंदे भारत एक्सप्रेस हा अभिमान, आरामदायक आणि संपर्क व्यवस्थेचा समानार्थी शब्द आहे, अशी टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसला मोदींनी हिरवा झेंडा दाखवल्याबद्दलचे ट्विट केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी केले आहे. त्याच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले:

“वंदे भारत एक्सप्रेस हा अभिमान, आरामदायक आणि संपर्क व्यवस्थेचा समानार्थी शब्द आहे. सिकंदराबाद आणि तिरुपती दरम्यानच्या ट्रेनमुळे पर्यटनाला, विशेषतः अध्यात्मिक पर्यटनाला फायदा होईल. यामुळे आर्थिक विकासालाही चालना मिळेल.”