पुष्पा 2 चे ट्रेलर वायरल

चित्रपट – एम एन सी न्यूज नेटवर्क – दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन यांनी पुष्पा चित्रपटातील साकारलेली पुष्पराज ही भूमिका अनेकांनी डोक्यावर घेतली होती. आता पुष्पा भाग 2 येत असून नुकतेच त्याचे ट्रेलर प्रसिध्द करण्यांत आले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टॉलीवूड चित्रपट समीक्षकांच्या  मतानुसार पुष्पा दाक्षिणात चित्रपट अनेक भाषात रिलीज झाला आणि त्याने देशपातळीवरही मोठा विक्रमी व्यवसाय केला. नुकतीच पुष्पा 2 चित्रपटाची सुमारे तीन मिनिटाची चित्रफीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात अनेक गोळ्या लागूनही पुष्पराज जिवंत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुष्पराज 2 या चित्रपटातील भूमिकेसाठी अल्लू अर्जुन यांनी खुप मोठी रक्कम मानधन घेतल्याची चर्चा होत असून निर्मात्यांनी मात्र या रकमेबाबत अद्याप कुठलाच खुलासा केलेला नाही.