
मुंबई-एम एन सी न्यूज नेटवर्क- ठराविक पठडीत तयार होणारे मराठी चित्रपट किंवा पारंपारिक विषयांना टाळून आता मराठीत सुद्धा वेगवेगळ्या विषयावर चित्रपट निर्माण होत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला झी स्टुडिओ आणि आटपाट यांची संयुक्त निर्मिती असलेला घर बंदूक बिरयानी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचा दिसून येत आहे. यातील एकूण सर्वच कलावंताच्या भूमिकेबद्दल प्रेक्षक चर्चा करताना दिसत आहेत.
नागराज मंजुळे, दक्षिणात्य चित्रपटातील सुप्रसिद्ध खलनायक आणि मराठी कलावंत सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नवीन चेहरा सायली पाटील यांच्या भूमिका आहेत.
दिग्दर्शक हेमंत आवताडे आणि स्वतः नागराज मंजुळे हे कलावंतांकडून अतिशय उत्तम प्रकारे अभिनय करून घेत असतात. नागराज यांच्या दृष्टिकोनातून अतिशय बारीक-सारीक गोष्ट नाही खूप मोठे महत्त्व असतं आणि ते या सर्व बाबी कलावंतांना समजून सांगत असतात. थोडक्यात नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे यांची अभिनयाची जुगलबंदी म्हणा किंवा आकाश ठोसर आणि सायली पाटील याचं यांचं गुन गुन हे गीत अनेकांच्या ओठावर आहे. मराठी चित्रपट नेहमीच पारंपारिक विषयाला धरून असत पण नागराज मंजुळे यांच्या अनेक चित्रपटाच्या कथानक सामाजिक आणि वेगळ्या स्वरूपाचे होते. आणि त्यांच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच व्हावा मिळवली आहे.
घर बंदूक बिरयानी हा वेगळ्या धाटणीचा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येत असून तिकीट बारीवर प्रेक्षकांची झुंबड उडाली आहे.

