मराठा सेवा संघ सभासद प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

मन-मनगट-मेंदू- मस्तक आणि मान सशक्त करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम लागू करा- प्रा.दिलीप चौधरी

परळी- एम एन सी न्यूज नेटवर्क- मन-मस्तक-मेंदु-मनगट- मान सशक्त करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या चळवळीत सक्रीय होणे महत्त्वाचे आहे. सर्व मराठा बहुजन बांधवांनी बहुजन महापुरुषांचा खरा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या महापुरुषांचा इतिहास प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. महामानवांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. असे प्रतिपादन प्रा. दिलीप चौधरी यांनी मराठा सेवा संघाच्या दोन दिवशी प्रशिक्षण शिबिराप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.

मराठा सेवा संघ प्रणित दोन दिवसीय सभासद प्रशिक्षण शिबीर दि. ८ व ९ एप्रिल रोजी थर्मल कॉलनी येथील कामगार कल्याण केंद्रात उत्साहात संपन्न झाले. बहुजन महापुरुष शिव-फुले-शाहु- आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिजाऊ वंदनेने प्रशिक्षण शिबिरास सुरुवात करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन जागृती मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन गंगाधर शेळके यांनी केले.

प्रा.गंगाधर शेळके उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले की की, बहुजन समाजानी शिव-फुले-शाहु-आबेंडकरी यांचे विचार अंगिकारणे काळाची गरज असुन वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन बहुजन समाजातील नवयुकांना मराठा सेवा संघाच्या प्रबोधन चळवळीत आणने खुप आवश्यक आहे. तसेच जनहित मल्टी स्टेट पंतसंस्थेचे चेअरमन उत्तमदादा माने यांनी आजच्या काळात तरुणाना चळवळी आणने व चळवळीचे महत्त्व समजाविण्यासाठी प्रशिक्षण शिबीर घेणे आवश्यक असुन मराठा सेवा संघ बहुजन समाजाचे प्रबोधन करण्याचे काम अनेक वर्षा पासुन करत असुन ही खुप समाधानाची बाब असल्याचे ते म्हणाले. प्रा एम.एल.देशमुख यांनी प्रशिक्षण शिबीर किती महत्त्वाचे आहे हे सांगीतले व उपस्थित सभासदाना प्रशिक्षण शिबिराच्या शुभेच्छा देवुन शिव-फुले-शाहु-आबेंडकरी विचाराची चळवळ बळकट करण्याचे काम मराठा सेवा संघ करतोय याबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

परळी औष्णिक विद्युत केंद्राचे प्रभारी अधीक्षक अभियंता धनंजय कोकाटे यांनी ही हजेरी लावली. उपस्थिती सभादानां विविध विषयावर सखोल मार्गदर्शन करताना प्रा. दिलीप चौधरी यांनी कुणबी -मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री कार्यक्रम लागू करावा असे आवाहन करत सभासदाना चित्रफितीच्या माध्यमातून व महापुरुषाच्या साहित्य संदर्भासह स्पष्ट करुन दाखविले. या वेळी मराठा सेवा संघाच्या विविध कक्षाचे पदाअधिकारी यामध्ये प्रकाश लेणेकर, संजय देशमुख, सेवकराम जाधव,अंकुश जाधव, ईश्वर सोनवणे, संदिप काळे, देवराव लुगडे,अभिमन्यु भिसे,राजेश ठोंबरे,संजय सुरवसे, राम (तात्या) जाधव, संदीप पाटील, दशरथ इंगळे,हनुमान इंगळे, राजेश पवार, वरुण पौळ, विठ्ठल साबळे, पी.एच.यादव,अमित माने,अरविंद कदम,सुंदर आमले,तुकाराम पाटील,अविनाश खरसडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.