जयपुर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस चे आज पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन

दिल्ली – एम एन सी न्यूज नेटवर्क- राजस्थान राज्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस चे पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन केले. की गाडी जयपूर ते दिल्ली दरम्यान धावणार आहे.ट्रेन दिल्ली ते अजमेर 5.15 तासात कव्हर करेल

राजस्थानमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला आज सकाळी 11 वाजता हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन केले. अजमेर-दिल्ली कॅन्टोन्मेंट वंदे भारत एक्सप्रेस ही हाय-राईज ओव्हरहेड इलेक्ट्रिक टेरिटरीवरील जगातील पहिली सेमी-हाय स्पीड पॅसेंजर ट्रेन असेल. वंदे भारत राजस्थान मधली पहिली एक्सप्रेस जयपुर ते दिल्ली केंट या दोन रेल्वे स्टेशनच्या मध्ये धावणार आहे. दरम्यान या गाडीची नियमित सेवा 13 एप्रिल 2023 पासून सुरू होईल आज गाडी क्रमांक 09617 वंदे भारत ट्रेन जयपुर स्थानकावरून रवाना होऊन गांधीनगर, बस्सी, दोसा, बांदिकुई, राजगड अलवर खैरतल, रेवाडी, पटोदी रोड, गडी हरसरु,आणि गुडगाव स्टेशन मार्गे दिल्ली केंट सायंकाळी चार वाजता पोहोचेल.