सोलापूर -धुळे महामार्गावर धावत्या ट्रकने पेट घेतल्याने ट्रक जळून खाक

बीड- एम एन सी न्यूज नेटवर्क: बीड जिल्ह्यातून गेलेल्या सोलापूर -धुळे महामार्गावर बीड बायपास नजीक आडुळ येथे फरशी घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकने पेट घेतल्याने ट्रक जळून खाक झाला.

सोमवारी दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान अडुळ फाट्या नजीक धुळ्या कडून फरसी वाहून नेणारा ट्रक नंबर TN 52 AA 2247 बीड कडे धावत होता. धावत्या ट्रक ला चालक केबिनमध्ये अचानकपणे आग लागली, चालकाने प्रसंगा अवधान दाखवून बाहेर उडी घेतली. त्यामुळे जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक जाळून खाक झाला.

आग विझवण्यासाठी जवळपास यंत्रणा नसल्याने आग विझवणे शक्य झाले नाही.