घडलेली घटनाअतिशय क्लेशदायी, त्याचे राजकारण करू नका,-आप्पासाहेब धर्माधिकारी

मुंबई खारघर- एम एन सी न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर येथील कार्यक्रमात श्रीसेवकांच्या झालेल्या मृत्यूवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काहींनी माणसाची किंमत इतकी असते का? अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या सुरू केल्या आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्या बद्धल सुरू असलेल्या राजकारणा बद्धल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली असून घडलेला प्रकार अतिशय क्लेशदायी आहे. झाला प्रकार वाईट झाला, त्याचे राजकारण करू नका, असे ते म्हणालेत.

जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी खारघर येथे झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. परंतु प्रचंड उष्मा असह्य ऊन उष्माघातामुळे 13 जण दगावल्याने विरोधी पक्षांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत ची टीका टिप्पणी सुरू असताना आप्पासाहेब धर्माधिकारींनी घडलेली घटना अतिशय क्लेशदायी असल्याचे मत व्यक्त केले आहे.

देशविदेशात पसरलेल्या असंख्य श्री सदस्यांचा परिवारा साठी ही घटना दुःखद असून माझ्यासाठी अतिशय क्लेशदायी आहे. माझ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. झाला प्रकार वाईट झाला, त्याचं राजकारण करू नका. आम्ही सर्वजण आपातग्रस्तांच्या सोबत आहोत. झाला प्रकार दूर्दैवी आहे. श्री सदस्य परिवारातील सर्व मृतांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो”, अशी प्रतिक्रीया धर्माधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.