सनरायझर्स हैदराबाद संघ समोर 192 धावाचे लक्ष

हैदराबाद- टाटा आयपीएल – आयपीएल-16 मधील मंगळवारचा 25 वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरू आहे. हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईने 5 गडी गमावून 192 धावा केल्या.

मुंबईने संघाने दिलेल्या आव्हान धावांचा पाठलाग करताना हैदराबादच संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या 25 धावा दरम्यान त्यांचे दोन गडी बाद झाले. दुसऱ्या षटकात ओपनर हॅरी ब्रूक 9 धावांवर, तर चौथ्या षटकात राहुल त्रिपाठी 7 धावांवर बाद झाला. दोघांची विकेट बेहरनडॉर्फने घेतली. नंतर मयांक अग्रवालने एडन मार्करमसोबत डाव पुढे नेला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 46 धावांची भागीदारी केली. मार्करम 22 धावा काढून ग्रीनच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात अभिषेक शर्माही 1 धाव काढून पीयूष चावलाच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर हेन्रिक क्लासेन आणि मयांक अग्रवालने फटकेबाजी करत धावसंख्या पुढे नेली. मात्र चौदाव्या षटकात चावलाने क्लासेनला झेलबाद केले. क्लासेनने 36 धावा केल्या.